शैक्षणिक संस्कार आणि सामाजिक एकात्मता हेच समाजाच्या उन्नतीचे अंग आहे – प्राचार्य डॉ. सुजित टेटे

◾️सुवर्णकार समाजाचे आराध्य दैवत नरहरी महाराजांना ७०९ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

देवरी २८: सुवर्णकार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यांच्या ७०९ व्या पुण्यतिथीनिमित्त देवरी येथे स्वर्णकार समाजाचे कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुजित टेटे, उद्घाटक संजू उईके नगराध्यक्ष देवरी, प्रमुख अतिथी नगरसेविका सीताबाई रंगारी, सुखदेव कालबांधे, गुलाबराव निनावे, सुभाष दुबे, प्रमोद रोकडे, ताराचंद निनावे, दिलीप रोकडे, बालकृष्ण वडिकार, फाविंद्र हाडगे, कमला मस्के, सरिता कावले, ममता रोकडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.

शैक्षणिक , आध्यात्मिक संस्कार , व्यवसाय शिक्षण आणि सामाजिक एकात्मता समाजाच्या उन्नतीसाठी आवश्यक असुन येणाऱ्या पिठीला याची जाणिव करुण देणे आपले कर्तव्य आहे असे मत प्रा. डॉ. सुजित टेटे यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी समाजातिल जेष्ठ नागरिकांनी मार्गदर्शन केले. युवा सोनार समाजाचे युवावर्ग प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाला परिसरातील सुवर्णकार समाजाचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत निनावे यांनी केले असुन कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन सुभाष दुबे, प्रमोद रोकडे, गुलाब निनावे आणि सुवर्ण सखी च्या कमला मस्के , पायल येरपुडे, अल्का दुबे, सरिता कावळे, शुभांगी निनावे , वैशाली टेटे आणि सर्व सदस्य यांनी केले असुन आभार प्रदर्शन गुलाबराव निनावे यांनी मानले.

Print Friendly, PDF & Email
Share