सुरतोली माध्यमिक विद्यालयात साइबर सेक्युरिटी चे धडे

◾️१० वी च्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन

देवरी: तालुक्यातील सुरतोली माध्यमिक विद्यालय लोहारा येथे १० वी च्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आले. त्यानिमित्ताने साइबर सेक्युरिटी या विषयावर क्लासमेटस् इन्फोटेक आणि कंप्यूटर प्रशिक्षण संस्थेद्वारे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे भुवनेश्वर पवार, प्रमुख अतिथी सुखदेव सर, मुख्याध्यापक सुभाष दुबे , नंदलाल नाईक, शहनाज मिर्झा, अलका दुबे, रंजित टेटे, देविदास टेटे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांना १० वीच्या बोर्डाच्या परीक्षेविषयी मार्गदर्शन करण्यात आले असून १० वी नंतर संगणक क्षेत्रातील कोर्सची माहिती देण्यात आली. सोशल मीडिया आणि साइबर सेक्युरिटी या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांना संगणक कोर्सची माहिती पत्रिका , दिनदर्शिका भेट देण्यात आले.

क्लासमेटस् इन्फोटेक आणि कंप्यूटर प्रशिक्षण संस्थेद्वारे विशेष कार्यशाळेचे आयोजन शाळेत केल्यामुळे शाळेच्या मुक्याध्यापक सुभाष दुबे यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

Print Friendly, PDF & Email
Share