इंग्रजीच्या पेपर ला चक्क ‘४८६’ विद्यार्थी गैरहजर !

हिंगोली जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेला पहिल्या दिवशी ४८६ विद्यार्थी गैरहजर

हिंगोली ◾️हिंगोली जिल्हयातील इयत्ता १२ वी च्या ३७ परीक्षा केंद्रावर दि. २१ फेब्रुवारी रोजी सकाळ सत्रात इंग्रजी या विषयाचा पेपर पार पडला. या विषयाच्या परीक्षेला १४४७८ विद्यार्थ्यांपैकी १३९९२ विद्यार्थी उपस्थित होते. तर ४८६ विद्यार्थी अनुपस्थीत राहील उपस्थितीचे प्रमाण ९६.६४ टक्के राहीले.

विभागीय मंडळाने नेमलेल्या ५ भरारी पथकाने हिंगोली जिल्हयातील परीक्षा केंद्राना भेटी दिल्या. प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलिस बंदोबस्त असुन परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका ने-आण करणा-या सहाय्यक परिरक्षकासोबत पोलिस कर्मचारी देण्यात आलेला होता तसेच जिल्हयात इंग्रजीचा पेपर सुरळीत पार पडला. कुठेही अनुचित घटना घडली नसल्याची माहिती जिल्हा परिषदेच्याशिक्षण विभागाने दिली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share