सिद्धार्थ कनिष्ठ महाविद्याल डवकी १२ वीच्या विद्यार्थांचा निरोप समारंभ

देवरी : सिद्धार्थ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय डवकी या ठिकाणी १२ वीच्या विद्यार्थांना निरोप देण्यात आला .त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य महेंद्र मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना या स्पर्धेच्या युगात चांगली प्रगती करण्यासाठी आपल्या जीवनाचे ध्येय ठरवायचे असते .त्यासाठी जिद्द चिकाटी, मेहनत या तीन गोष्टींचा अवलंब केला पाहिजे.तेव्हाच जीवनामध्ये आपण प्रगती करू शकतो .तसेच कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून डांगे पोलीस निरीक्षक देवरी यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगताना पुढे जाण्यासा ठी ज्या क्षेत्राची आवड आहे त्या क्षेत्राची निवड करा.तसेच अधिव्याख्याता वर्षा गगने मनोहरभाई पटेल महाविद्यालय देवरी यांनी सुद्धा विद्यार्थांना स्वताचे गुण व क्षमता ओळखून आपले ध्येय ठरवावे .व ध्येय वेडे व्हावे . तसेच अपयश आले तरी खचून न जाता सामना करण्याची जिद्द ठेवावी.प्राचार्य धनराज हुकरे शिवराम महाविद्यालय मरामजोब यांनी गोष्टींच्या माध्यमातून आवडेल त्या क्षेत्रात प्रगती करावी. आई वडील यांचे नाव उज्ज्वल करा.या विषयी मार्गदर्शन केले.लक्ष्मण नाईक जेष्ठ नागरिक ,रामूजी परसगाये तंटामुक्त अध्यक्ष डवकी यांनी मार्गदर्शन केले .कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेंद्र बोरकर ,सुषमा जवांजर ,ममता टेंभूर्निकर ,सरिता मेश्राम ,धर्मेंद्र भोवते, विधार्थानमध्ये प्रेरणा लांजेवार ,दिव्या भूरकुडे,कावेरी मस्के यांनी आपले मनोगत व्यक्त केले .कार्यक्रमाचे संचालन प्रेरणा नाईक तर आभार योगेंद्र बोरकर यांनी केले .महाविद्यालयातील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले .

Share