मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा देवरी तालुक्याचा निकाल जाहीर

देवरी◾️मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत शैक्षणिक सत्र २०२३-२४ मध्ये जिल्हा परिषद, खाजगी अनुदानित व शासकीय शाळांचे केंद्रस्तरीय प्राप्त अहवालानुसार तालुका मुल्यांकन समिती मार्फत मुल्यांकन करण्यात आले. त्यामध्ये खाजगी अनुदानित व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये छत्रपती शिवाजी हायस्कूल संलग्न कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाने व जिल्हा परिषद वरिष्ट प्राथमिक शाळा सावली तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला.

जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मेहताखेड व शिवराम विद्यालय मुरदोली/मरामजोब द्वितीय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मासुलकसा व सुरतोली माध्यमिक विद्यालय लोहारा तृतीय क्रमांकावर आहेत.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत शैक्षणिक सत्र 2023-24 मध्ये जिल्हा परिषद, खाजगी अनुदानित व शासकिय शाळांचे केंद्रस्तरीय प्राप्त अहवालानुसार तालुका मुल्यांकन समिती मार्फत दिनांक 14/02/2024 ते 20/02/2024 या कालावधीत मुल्यांकन करण्यात आले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share