आश्रमशाळेतील ४ शिक्षकांचा उत्कृष्ट शिक्षक म्हणून गौरव

देवरी: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी अंतर्गत येणाऱ्या सर्व आश्रमशाळांमध्ये जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण विचार उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमात सर्वात महत्त्वाची भूमिका ही शिक्षकाची आहे.त्यामुळे जे शिक्षक दैनंदिन अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये नवनवीन संकल्पना,विद्यार्थी स्वतःहून शिकू शकतील असे
उपक्रम, नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्य निर्मिती व वापर करणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांचा प्रत्येक महिन्याला देवरीचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यात

पुरस्कार प्राप्त शिक्षक:-

१). आशिष रामलाल राऊत माध्यमिक शिक्षक शासकीय माध्यमिक आश्रम शाळा ककोडी.
२). सुरेखा शंकर कोरे प्राथमिक शिक्षिका शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा पुराडा.
३). प्रमिला अरुण पाटील उच्च माध्यमिक शिक्षिका शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा बोरगाव बाजार.
४). राहुल आत्माराम टेकाडे प्राथमिक शिक्षक शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा बोरगाव बाजार यांचा समावेश आहे.

प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांची प्रतिक्रिया:

आश्रम शाळेतील शिक्षकांना शिक्षक आणि पालक अशा दोन्ही भूमिका पार पाडाव्या लागतात. त्यामुळे जे शिक्षक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी उत्कृष्ट काम करतात अशा शिक्षकांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्यामुळेच आम्ही प्रत्येक महिन्याला उत्कृष्ट अशा शिक्षकांचा सत्कार करतो आहे.
◆प्रकल्प अधिकारी◆
विकास राचेलवार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी.

Print Friendly, PDF & Email
Share