उद्या देवरी येथे ‘तुच माझी सौभाग्यवती’ नाट्य प्रयोग

देवरी : येथे तरुण पंचशिल नाटय उत्सव मंडळाच्या सौजन्याने धनंजय स्मृती रंगभूमी वडसा निर्मित ‘तूच माझी सौभग्यवती’ या नाट्य प्रयोगाचे आयोजन ९ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वा. करण्यात आले आहे.

संपुर्ण कुटूंबानी एकन्नीत बसुन पाहण्या सारखी एक अप्रतिम सुपरहिट नाटक तसेच या नाट्यप्रयोगात दोन रेकॉर्डिंग डांसचे सादरीकरण होणार आहे. सदर नाट्य प्रयोग समाजमंदिर पंचशील चौक देवरी च्या भव्य पटांगणात बंद शामियान्यात होत आहे.

या नाटकाचे निर्माता नितीन प्रशांत नाकाडे, दिग्दर्शक धनश्याम उपरीकर, किरपाल सयाम दुधराम कावळे , स्वर. घनश्याम उपरीकर , आनंद नाकाडे, शुभम हुड , रतन सोमवारे, सोहन शुक्ला, मिस नयना , मिस करीष्मा ,मिस मयुरी ,मिस रुपाली यांच्या अभिनयाची जादू बघावयास मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Print Friendly, PDF & Email
Share