प्रजीत नायर गोंदियाचे नवे जिल्हाधिकारी

⬛️गोंदियाचे जिल्हाधिकारी गोतमारे विदर्भ वैधानिक मंडळाचे सचिव

गोंदिया: राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने आज 1 फेबुवारीला पुन्हा काही आयएएस अधिकार्यांच्या बदल्या केल्या असून गोंदियाचे जिल्हाधिकारी म्हणून सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांची नियुक्ती केली आहे. 2017 बॅचचे आईएएस अधिकारी असून त्यांची AIR 87 वी रैंक होती. गोंदियाचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांची नागपूर येथील विदर्भ वैधानिक महामंडळाच्या सदस्यसचिव पदावर बदली केली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share