निकृष्ट कामे आणि बोगसपणात देवरी तालुका प्रसिद्ध, माध्यमांनी केला “पोस्टमार्टम”

🔺 डस्ट ऐवजी रेतीच्या माध्यमातून होणार उर्वरित काम

देवरी ⬛️ पंचायत समिती देवरी अंतर्गत होणाऱ्या अनेक कामात अनियमितता , निकृष्ट दर्जा , भरष्टाचार आणि बोगसपणा अनेक वेळा माध्यमांनी समोर आणून भंडाफोड केला आहे. तरी सुद्धा निकृष्ट आणि बोगस कामाचे प्रमाण कमी होत नसल्याचे चित्र पुन्हा एकदा एक्सपोज झाले आहे.

देवरी तालुक्यातील गट ग्रामपंचायत पिंडकेपार/ गो. हद्दीत येणाऱ्या गावातून मुख्य रस्त्यावर मागील दोन ते तीन आठवड्यापासून सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे.हा बांधकाम पूर्णतः निकृष्ट होत आहे. या रस्त्याचे बांधकाम करताना सदर ठेकेदाराने खडीकरण न करता, जुन्या रस्त्यावरील असलेला डांबर जसाचा तसा तळाला ठेवला आहे. जुन्याच डांबर रस्त्यावरील डांबरावर सिमेंट दगडाचे काँक्रीट तयार करून बिछविण्याच्या प्रकार सुरू आहे. सिमेंट काँक्रीट मध्ये रेतीचा उपयोग न करता दगडाचा चुरा (डस्ट) चा वापर मोठ्या प्रमाणात हा रस्ता बनविण्यासाठी केला जात आहे. त्याचप्रमाणे रस्त्यावर सिमेंटचा वापर अल्प प्रमाणात होत आहे. तयार करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीटवर सुरुवातीपासूनच एकही पाण्याचा थेंब सुद्धा पडला नाही. अंदाजपत्रकानुसार सदर बांधकाम हे निकृष्ट होत आहे असा गावातील लोकांमध्ये तसेच रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये चर्चेला उधाण आलेला आहे. कामाचा फलक सुद्धा कुठेही लावण्यात आलेला नाही.
याविषयी गावातील काही नागरिकांनी सदर ठेकेदाराला विचारना केली असता, ठेकेदार उडवा उडवी चे उत्तरे देत असल्याची बाब समोर आली आहे. याच प्रकारचे देवरी तालुक्यात कित्येक कामे सुरू असून, अशाप्रकारच्या काम भ्रष्टाचाराच्या छायेत वावरत आहेत असा अंदाज वर्तविला जात आहे. अशा निकृष्ट होनारे सिमेंट रस्ते कितपत मजबूत होणार.. अशी चर्चा सध्या तालुक्यातील नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे. या सिमेंट रस्त्याच्या बांधकामाकडे सार्वजनिक बांधकाम तसेच लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष झाले आहे. सदरच्या बातम्या माध्यमांनी प्रकाशित केल्याने कंत्राटदार, पेटीठेकेदार आणि लोणी खाणारे दलाल यांची गोची झालेल्याचे चित्र आहे.


तालुक्यात होत असलेले रस्ते चौकशी विना..
देवरी तालुका आदिवासी तसेच नक्षलग्रस्त क्षेत्र असून तालुक्याच्या सर्वांगीण विकासाकरिता शासनाने वेगवेगळ्या योजनातून अनेक रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यासाठी कंत्राटदाराच्या सहाय्याने तालुक्यात भरमसाठ नवीन रस्त्याचे काम सुरू आहे. परंतु, एकही अधिकारी वर्ग या कामाच्या तपासणी करिता येत नाही. असे तालुकावाशीयांचे म्हणणे असून होणारे रस्त्याचे बांधकाम पूर्णतः निकृष्ट होत आहेत .याकडे शासनाचे तसेच लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष आहे.

माध्यमांच्या वृत्त प्रकाशनानंतर त्या रस्त्याची प्रशासनाने घेतली दखल डस्ट ऐवजी रेतीच्या माध्यमातून होणार उर्वरित काम
वृत्त प्रकाशित झाल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाची झोप उडाली आणि तत्काळ डस्ट ऐवजी चांगल्या दर्जाची रेती टाकून उर्वरित बांधकाम रेती द्वारे करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे हे गौडबंगाल समाजासमोर उघड पडल्यामुळे स्थानिक प्रशासन लोकप्रतिनिधी यांची चांगलीच आगपाखड झाली असल्याचेही चित्र आहे.
शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीतून तयार होत असलेला रस्ता व त्याची गुणवत्ता बघून हा रस्ता किती दिवस टिकेल याची सास्वती नाही.

माध्यमाच्या वृत्तांकनानंतर आकपाखड :

शासनाच्या निधीची पद्धतशीरपणे विल्हेवाट लावण्याचे काम स्थानिक लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांना घेऊन कंत्राटदारामार्फत सुरू असल्याचे दिसून येत आहे अत्यंत निकृष्ट पद्धतीने रस्ता बांधकाम होत असताना गावकऱ्यांनी हटकले मात्र ठेकेदार लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या संगनमताने सदर काम बिन बोभाट सुरू असल्याचे दिसून येत आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share