ब्लॉसम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी केले 75व्या प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहन

देवरी: स्थानिक ब्लॉसम पब्लिक स्कूल देवरी येथे आपली परंपरा कायम ठेवत विद्यार्थ्यांच्या हातून ध्वजारोहन करण्यात आला. विद्यार्थ्यांना खऱ्या लोकशाहीचे धडे शाळेतच शिकायला मिळायला पाहिजे आणि देशाविषयीचा अभिमान शालेय पातळीवरचं जागृत झाला पाहिजे या उद्देशाने प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांनी शैक्षणिक वर्षात उत्कुष्ट कार्य करणाऱ्या तेजस घनश्याम हलमारे आणि जिया मनोज राऊत या विद्यार्थ्यांच्या हस्ते शाळेत ध्वजारोहण पार पडले.
या प्रसंगी व्यासपीठावर मुख्य अतिथी म्हणून डॉ. सुजित टेटे, निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
नियोजित वेळेवर शालेय पटांगणावर विध्यार्थ्यांनी ध्वजारोहण केला. स्वागतगीत, देशभक्ती गीत गायन करून विध्यार्थ्यांनी देशा विषयची भावना व्यक्त केली. विध्यार्थी जीवनात खरी लोकशाहीची बीजे रोवली जावी , एखाद्या आमदार खासदार प्रमाणे विध्यार्थ्यांना सुद्धा ध्वजारोहण करता यावी, देशा विषयीचा आदर आणि अभिमान शालेय जीवनापासून चिरकाल टिकून राहावे या संकल्पनेतून सदर ध्वजारोहण सोहळा पार पडला.

सूत्रसंचालन वैशाली मोहुरले यांनी केला आभार प्रदर्शन सरिता थोटे यांनी मानला. कार्यक्रमाच्या यशासाठी सर्व शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचाऱ्यांनी आणि पालकांनी सहकार्य केला.

Share