गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह अनुदान ११ लाभार्थ्यांना वाटप

देवरी ⬛️ तहसील कार्यालय देवरी येथे गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह अनुदान योजनेची तालुकास्तरीय समितीची बैठक संपन्न झाली असून ११ लाभार्थ्यांना प्रति प्रस्ताव २ लक्ष रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले.

तालुकास्तरीय समितीची दर महिन्याला बैठक होत असते त्यानुसार दर महिन्याला जे जे प्रस्ताव प्राप्त होतात त्या प्रस्तावांची छाननी करून तालुकास्तरीय समितीमार्फत सदर प्रस्ताव हे मंजूर केले जातात.पूर्वी ही योजना विमा कंपनी मार्फत राबवली जात होती परंतु सदर योजना राबविताना विमा कंपनीकडे प्रस्ताव दिल्यामुळे त्रुटींचे प्रमाण वाढत होते व अनुदान मिळण्यास विलंब होत होता परंतु आता सध्या ही योजना तालुकास्तरीय समिती कडे वर्ग करण्यात आल्या कारणाने प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर तात्काळ अनुदानाची कार्यवाही केली जाते. आतापर्यंत तालुक्यात एकूण 14 प्रस्ताव प्राप्त होते त्यातील 11 प्रस्तावांना मंजुरी मिळालेली आहे त्या प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यानंतर प्रति प्रस्ताव २ लक्ष रूपये अनुदान प्राप्त झाले व सदर अनुदान हे लाभार्थ्यांना तालुक्याचे उपविभागीय अधिकारी सत्यम गांधी, तालुक्याचे तहसीलदार एन टी पवार, तालुकास्तरीय समितीचे सदस्य देवरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रविण डांगे व तालुकास्तरीय समितीचे सदस्य सचिव तालुका कृषी अधिकारी देवरी लालन राजपूत मॅडम उपस्थित होत्या यावेळी मान्यवरांच्या हस्ते तालुक्यातील लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले.

Share