डाटा एंट्री ऑपरेटरच्या भरतीपूर्वीच उमेदवारांना २-३ लाखात नोकरीचे आमिष

⬛️मुकाअंकडे करण्यात आली तक्रार , संस्थेवर कारवाई करण्याची मागणी

गोंदिया : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत जलजीवन मिशन सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एका खासगी संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील आठही तालुक्यात अभियंता तसेच डाटा एन्ट्री ऑपरेटरची पदे भरायची आहेत. संस्थेची निवड झाली असली तरी भरतीचा मुहूर्त सापडला नसतानाही संबंधित संस्थेच्या माध्यमातून उमेदवारांची चाचपणी करून निवडीसाठी २ ते ३ लाख रुपयांची ऑफर दिली जात असल्याचा प्रकार पुढे आला आहे. याबाबतची तक्रार शिवसेनेचे गोरेगाव तालुका संघटक प्रमुख दुर्गेश बिसेन यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. गोंदिया यांना निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत राज्य शासनाच्यावतीने गावांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात. अशातच गावातही सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाचा तिढा मार्गी लागावा, यासाठी शासन प्रयत्न करीत आहेत्या अनुषंगाने शासनाने जलजीवन मिशन ग्रामीण तसेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बाह्य यंत्रणेची निवड केली आहेत्या अनुषंगाने गोंदिया जिल्ह्याकरिता सिंनगेस सोलुसन कंपनीची निवड करण्यात आली आहे. संस्थेची निवड करण्यात आली असली तरी मुख्याधिकाऱ्यांनी अद्याप भरतीचे निर्देश दिलेले नाही. जिल्ह्यातील आठही तालुके मिळून अभियंता तसेच डाटा ऑपरेटर यांची एकूण २७ पदे भरावयाची आहेत. या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जलजीवन मिशन, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

Print Friendly, PDF & Email
Share