गोंदिया जिप च्या जीर्ण इमारती होणार जमीनदोस्त

गोंदिया : ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या मालकीच्या मोठ्या प्रमाणात इमारती आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून वेगवेगळ्या विभागांनी तयार केलेल्या इमारती आजघडीला धोकादायक स्थितीत आहेत. अशा इमारतींची ओळख पटवून त्यांची सद्यस्थिती जाणून त्या इमारती पाडण्यात येणार आहेत. यासंदर्भात जिल्हा परिषदेने पंचायत समित्यांकडून माहिती गोळा केली आहे.

जिल्हा परिषदेच्या अधिनस्त विविध प्रशासकीय विभाग, योजनांच्या निधीतून इमारतींचे बांधकाम करण्यात आले. काळाच्या ओघात त्यातील काही इमारती जीर्ण होऊ मोडकळीस आल्या आहेत. मात्र अशा इमारती पाडण्यासंदर्भात जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम तसेच ग्रामपंचायत अधिनियमात स्पष्ट उल्लेख नाही. त्यामुळे त्या इमारती पाडून नवीन बांधकाम करण्यास अडचण निर्माण होत आहे. जीर्ण इमारती पाडण्यासाठीही अडचणी होत होती. मात्र शासनाने तयावर तोडगा काढण्याच्या उद्देशाने परिपत्रक काढले. त्यानुसार जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकार्‍यांना पत्रव्यवहार केला असून प्रत्येक तालुक्यात जिल्हा परिषदेच्या अधिनस्त असलेल्या जीर्ण झालेल्या शासकीय इमारतींची प्रत्यक्ष मोका तपासणी करुन इमारती पाडण्यासंदर्भात संपूर्ण अहवालासह प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासंदर्भात जिल्हा परिषदेने सर्व गटविकास अधिकार्‍यांना पत्रव्यवहार केला आहे.

Share