लाचखोर एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय तिरोडा येथिल प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी व अंगणवाडी पर्यवेक्षिकावर कारवाई, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथपकडला

प्रहार टाईम्स|भुपेन्द्र मस्के

गोंदिया: तक्रारदार हे आय जी एम कॅम्पुटर एज्युकेशन नावाची संगणक संस्था चालवित असुन जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत महिला व बालकल्याण विभागाच्या अनुसूचित जाती व जमाती या प्रवर्गातील मुलींना व्ययक्तिक लाभाचे योजनेअंतर्गत संगणक प्रशिक्षण देत आहेत. तक्रारदार यांनी महाराष्ट्र ज्ञान महामंडळ पुणे येथे एकुण ३५ लाभार्थ्यांचे प्रशिक्षण शुल्क आॅनलाईन पध्दतीने संगणक प्रशिक्षण देत आहेत.

सदर देयकाबाबद ३० डिसेंबर २०२०ला दुरध्वनीच्या माध्यमातून विचारपूस केली असता श्रीमती बावणकर, बालविकास प्रकल्प अधिकारी तिरोडा यांनी ३५ लाभार्थ्यांचे ६००/- रूपये प्रति लाभार्थी प्रमाणे २१०००/- हजार रुपयांची मागणी पंचायत समिती तिरोडा येथे पाठविण्यासाठी केली होती.

तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविल्यानंतर १९ जानेवारी रोजी सापळा रचण्यात आला. यावेळी एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय तिरोडा येथिल प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी अंजली गोविंदराव बावणकर व अंगणवाडी पर्यवेक्षिका उषा यशवंतराव आगासे यांचेवर विस हजार रुपयांसाठी हा यशस्वी सापळा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचला. व ला.प्र.का अन्वये गुन्हा नोंद केला

सदर कामगिरी पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार, मिलिंद तोतरे अपर पोलिस अधिक्षक नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक रमाकांत कोकोटे, स.फौ. शिवशंकर तुंबळे, पो.हवा. राजेश शेंद्रे, ना.पो.शि. नितीन रहांगडाले, राजेंद्र बिसेन व मनापोशि गिता खोब्रागडे, वंदना बिसेन यांच्या पथकाने ही कारवाई केली.

लाच मागितल्यास येथे करा तक्रारकोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यावतीने खासगी व्यक्तीने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास, गोंदिया अँटी करप्शन ब्युरोकडे दूरध्वनी क्र. ०७१२२-२५१२०३ किंवा मोबाइल क्रमांक ९१६८२१४१०१ किंवा १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे

Share