आदर्श शाळा सावली येथे पालक मेळावा उत्साहात साजरा

देवरी ◼️ आदर्श शाळा सावली येथे पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले .पालक मेळाव्याचे अध्यक्ष संजय बिंजलेकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ,दीपप्रज्वलक झुलनताई पंधरे सरपंच ग्रां.पं. सावली तसेच प्रमुख उपस्थितीत उपसरपंच राजेश्वरी ताई बिंझलेकर, प्रभुदयाल पवार तंटामुक्त समिती अध्यक्ष, चंद्रसेनजी रहांगडाले पोलीस पाटील, शिवेंद्र सिंह परिहार उपाध्यक्ष, मनोहर भेलावे अनिल भेलावे, संतोष कंस मारे, ललित पवार छायाताई शहारे ,मनोरमा शेंडे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, नाजुका ताई गौतम ग्रामपंचायत सदस्य ,रवींद्र मुनेश्वर व सर्व गनमान्य पालक यांच्या उपस्थितीत पालक मेळावा उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिपक कापसे मुख्याध्यापक यांनी आदर्श शाळा व स्वच्छ सुंदर शाळा उपक्रमाविषयी तसेच स्नेहसंमेलन व ट्रीपचे नियोजन याविषयी चर्चा घडवून आणली तसेच पालकांनी पाल्यांच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष देण्याची गरज सांगितली. संदीप तिडके पदवीधर शिक्षक यांनी लोकांचा सहभाग शाळेविषयी असावा तसेच विद्यार्थ्यांमध्ये सर्व गुण संपन्नता यावी आणि पालकांनी शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी व्हावे याविषयी विशेष मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन तुषार कोवले सहायक शिक्षक यांनी केले कार्यक्रमाचे आभार वर्षा वालदे पदवीधर शिक्षिका यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी जोहनलाल मलगम सहाय्यक शिक्षक, मायाताई उईके ,सोनवणे मॅडम, बिनलेकर मॅडम स्वयंसेविका सावली यांनी विशेष प्रयत्न केले.

Print Friendly, PDF & Email
Share