विदर्भात गोंदिया सर्वाधिक ‘कूल’

Gondia :दिवाळी संपताच जिल्ह्यात हिवाळ्याची चाहूल लागली असून आज, 20 नोव्हेंबर रोजी विदर्भात गोंदिया सर्वाधिक ‘कूल’ राहिला. 15.5 अंश सेल्सिअस या आतापर्यंतची निचाक्काची नोंद करण्यात आला. यंदा ऑक्टोबर महिना लोटून देखील हिवाळ्याची चाहूल लागली नव्हती. दिवसा प्रखर उष्णता व रात्री गारवा अशा संमिश्र वातावरणाचा सामना जिल्हावासीयांनी केला.

मात्र दिवाळी आटोपताच वातावरणात दिवसेंदिवस घट होत असून हिवाळीच्या थंडीचा आनंद जिल्हावासी घेत आहे. 20 नोव्हेंबर रोजी दिवसभर गार वार्‍यामुळे दिवसाही नागरिकांना थंडीचा सामना करावा लागला. वाहनचालक गरम कपडे परिधाम करुनच बाहेर पडल्याचे पहायला मिळाले. यंदाचे आतापर्यंतचे सर्वाधिक कमी तापमान 15.5 अंश सेल्सिअस आज नोंदविले गेले. जिल्हा जंगल प्रणव असल्याने उन्हाळ्यात तप्त व हिवाळ्यात कडक थंडी अशा दोन्ही वातावरणाला जिल्हावासीयांना दरवर्षी सामोरे जावे लागते.

Share