मप्र निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्याच्या सिमांवर नाकाबंदी

गोंदिया : जिल्ह्याच्या सिमेला लागून असलेल्या मध्यप्रदेश व छतीसगड राज्यात विधानसभा निवडणुक होत आहे. यादरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी सीमावर्ती भागात कडक पोलिस बंदोबस्त लावला आहे. सीमावर्ती भागात तपासणी नाके तयार करण्यात आले आहेत. या नाक्यावर दुचाकींसह, तिनचाकीह, चारचाकी वाहने व इतर वाहनांची तपासणी केली जात आहे.

आमगावपासून मध्यप्रदेशाची सीमा केवळ पाच किमी अंतरावर आहे. या भागातील नागरिकांची मध्यप्रदेशातील लांजी परिसरात ये-जा सुरू असते. तसेच गोंदिया आणि आमगाव येथून लांजीसाठी मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल्स सुद्धा जातात. निवडणुकीदरम्यान रोखड वाहून नेली जात असल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर बाघ नदीजवळ मध्यप्रदेशच्या सीमेजवळ तपासणी नाका तयार करण्यात आला आहे. तर महाराष्ट्र पोलिसांनी सुद्धा याठिकाणी चौकी तयार केली आहे. दोन्हीकडून येणार्‍या दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांची या नाक्यावर तपासणी करून पुढे पाठविले जात आहे. तसेच याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहेत. याठिकाणी पोलिसांसह महसूल व वनविभागाचे कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत.

निवडणुकी दरम्यान रोख रक्कम आणि दारूची वाहतूक होत असते. या प्रकाराला पायबंद लावण्यासाठीच ही उपाययोजना केली जात आहे. या तपासणी नाक्यावर तीन पाळीत कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षा बलाचे जवान देखील दक्ष झाले आहे. रेल्वे गाड्यांमध्ये साध्या वेशातील पोलिस कर्मचारी संशयितांच्या हालचालीवर नजर ठेवून आहे. एखादा संशयित व्यक्ती आढळल्यास त्याची पोलिस कर्मचारी कसून चौकशी करीत आहेत. मध्यप्रदेशात 17 नोव्हेंबरला निवडणूक होत आहे. त्या पृष्ठभूमिवर जिल्ह्याच्रूा सितावरती भागात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share