पोलिसांची एक दिवाळी आदिवासींसोबत
गोंदिया◼️जिल्हा पोलिस विभागाच्या वतीने 11 नोव्हेंबर रोजी कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत सशस्त्र दूरक्षेत्र मगरडोह हद्दीतील चिलमटोला येथे ‘एक दिवाळी आदिवासींसोबत’ उपक्रम राबविला. यावेळी समाजबांधवांना विविध साहित्याचे वाटप करण्यात आले.
जिल्हा पोलीस दलातर्फे नक्षलग्रस्त भागातील नागरिकांमध्ये पोलीस प्रशासना प्रती विश्वास व आपुलकीची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर साहेब यांच्या संकल्पनेतून कम्युनिटी पोलिसिंगतंर्गत उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनात मगरडोह सशस्त्र दूरक्षेत्रचे पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर ढिकणे व त्यांच्या पथकाने जिल्हा पोलिसाच्या सहकार्याने चिलमटोला येथे एक दिवाळी आदिवासी बांधवासोबत हा उपक्रम राबविला. यावेळी चिलमटोला येथील नागरिकांना दिवाळीनिमीत्त फराळाचे साहित्य असे विविध जीवनाआवश्यक सामान वाटप करण्यात आले. प्रसंगी उपस्थित पोलिस अधिकार्यांनी नागरिकांनी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कार्यक्रमाला संरपच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती सदस्य, पोलिस पाटील व गावातील प्रतीष्टीत नागरीक उपस्थित होते.