यावर्षी बाम्हणीत (खडकी) झाडीबोली साहित्य संमेलन

गोंदिया ◼️झाडीबोली साहित्य मंडळ केंद्रीय समितीचे 31 वे झाडीबोली साहित्य संमेलन सडक अर्जुनी तालुक्यातील बामनी (खडकी) येथे 16 व 17 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. संमेलनात झाडीपट्टीचे साहित्यिक, कवी, लेखक, लोक कलावंत मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत.

संमेलनाचे स्वागताध्यक्षपदी सरपंच विलासराव वट्टी, कार्याध्यक्षपदी चंद्रकुमार बहेकार, सहकार्याध्यक्षपदी विलासराव शिवनकर, समन्वयकपदी नरेश भेंडारकर यांची निवड करण्यात आली आहे. या संमेलनात साहित्य प्रेमींनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवून सहकार्य करावे, असे आवाहन केंद्रीय समितीच्या वतीने जिल्हा शाखा गोंदियाचे जिल्हाध्यक्ष पवन पाथोडे, उपाध्यक्ष मुरलीधर खोटेले, सचिव प्रा. अश्‍विन खांडेकर, संघटक सुशीलकुमार खापर्डे कार्यकारिणी सदस्य सुखचंद वाघमारे, चंद्रकुमार बहेकार, प्रा. इंद्रकला बोपचे, लोकराम शेंडे, नुरजहा पठाण, दिनेशकुमार अंबादे, लोकेश नागरीकर, चंदु पाथोडे, बिरला गणवीर, देवेंद्र रहांगडाले यांनी केले आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें