देवरी तालुका विज्युक्टा कार्यकारिणी गठीत
देवरी: विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशनची सहविचार सभा व निवडणूक विषयक कार्यक्रम मनोहरभाई पटेल कनिष्ठ महाविद्यालय देवरी येथे संपन्न झाली. यावेळी तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली. सदर सहविचार सभा व निवडणूक विषय कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मनोहर भाई पटेल कनिष्ठ महाविद्यालय देवरीचे प्राचार्य जी.एम. मेश्राम सर यांनी भूषविले तर सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा विज्युक्टा अध्यक्ष प्राध्यापक पोमेंद्र कुमार कटरे, जिल्हा सचिव प्राध्यापक अरविंद सरनागत, जिल्हा सहसचिव प्राध्यापक धनलाल मसराम, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक जागेश्वर भेंढारकर आदी उपस्थित होते. गठीत करण्यात आलेल्या कार्यकारिणीत देवरी तालुका अध्यक्ष म्हणून प्राध्यापक श्यामलाल देशमुख, तालुका सचिव प्राध्यापक मधुकर शेंद्रे, तालुका उपाध्यक्ष प्राध्यापिका सौ. उर्मिला परिहार, प्राध्यापक सुनील वाघमारे, तालुका कोषाध्यक्ष प्राध्यापक संजय भांडारकर, संघटन सचिव प्राध्यापक धर्मवीर लोणारे, तालुका प्रसिद्धी प्रमुख प्राध्यापक नरेश कुमार पटले, तालुका सहसचिव प्राध्यापक राकेश कुमार मेश्राम, प्राध्यापक योगराज बिसेन, प्राध्यापक सुभाष लांजेवार, प्राध्यापिका सौ. अर्चना जंजाळ तर कार्यकारिणी सदस्य म्हणून प्राध्यापक प्रदीप रामटेके, प्राध्यापक चेतन कुमार जंजाळ , प्राध्यापक अनिल मेश्राम, प्राध्यापक स्वस्तिक निमजे, प्राध्यापक जगदीश खेडकर, प्राध्यापिका अश्विनी झंजाळ, प्राध्यापिका लीना चौधरी, प्राध्यापिका सौ. सुनंदा भुरे, प्राध्यापिका सौ. तेजस्वरी गायधने आदींची बिनविरोध निवड करण्यात आली. . सदर निवडणूक विषयक कार्यक्रमाचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक मिलिंद चौधरी व केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक जागेश्वर भेंढारकर यांनी भूमिका पार पाडली. सदर सहविचार सभा व निवडणूक विषय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका अश्विनी झंजाळ यांनी तर कार्यक्रमाचे समापन प्राध्यापिका उर्मिला परीहार यांनी केले.