अनुसूचित जातीच्या नवउद्योजक तरुणांसाठी स्टँड अप इंडिया मार्जिन मनी योजना

केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील सवलतीस पात्र नवउद्योजक तरूणांना मार्जीन मनी उपलब्ध करून देणेबाबतची योजना समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील सवलतीस पात्र १८ वर्षावरील नवउद्योजक तरूणांनी १० टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टॅंड अप इंडिया योजनेअंतर्गत ७५% कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित फ्रंट एंड सबसिडी अनुषंगाने नवउद्योजकांना प्रकल्प मूल्याच्या १५% हिस्सा (अनुदान) राज्य शासनामार्फत देण्यात येईल.

सदर योजनेच्या मार्गदर्शक सूचना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्रमांक मासाका-२०१८ /प्र.क्र. २५९/ (२)/अजाक, दिनांक ८ मार्च, २०१९ व शा. नि. क्रमांक स्टँडई-२०२० /प्र.क्र.२३ /अजाक, ०९ डिसेंबर २०२० अन्वये शासन स्तरावरुन निश्चीत करण्यात आल्या आहेत. सदर चा शासन निर्णय शासनाच्या WWW.Maharashtra gov. inसंकेतस्तळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे.

Share