डॉ. शितल खंडागडे यांचा निरोपपूर्व सत्कार

देवरी: तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केन्द्र मुल्ला अंतर्गत पुराडा येथील फिरते आरोग्य पथक येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.शितल खंडागडे यांची बदली आयुर्वेदिक रुग्णालय वरोडी पठार, तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर येथे झाली. त्या प्रसंगी सत्कार समारोह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सविस्तर वृत्त असे की डॉ.शीतल खंडागडे हे 10 वर्षा पासुन फिरते आरोग्य पथक पुराडा येथे कार्यरत होत्या.त्यांच्या कार्यकाळात अती संवेदनशील असलेल्या पुराडा क्षेत्रातील गरजु लोकांना आरोग्य सेवा प्राप्त झाल्या. याप्रसंगी कार्यक्रमात उपस्थित प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.येरने तसेच डॉ. मरापे , सोनटक्के सिस्टर, डॉ. कोल्हारे , प्राथमिक आरोग्य केन्द्र मुल्ला येथील आरोग्य सेवक व आरोग्य सेविका तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share