कृषीकन्यांनी दिली शेतकऱ्यांना रासायनिक फवारणीचे मार्गदर्शन

आमगाव : मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील कृषी कन्या रक्षा ढबाले, स्नेहल गडकरी, सृष्टी फूलझेले, निमीला चिडे आणि प्रतीक्षा चाहाडकर यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभूत व कृषी औद्यौगिक कार्यक्रम 2023-24 अंतर्गत कृषी कन्यानी आसोलीच्या शेतकऱ्यांना कीटनाशकांचा योग्य वापर, फवारणी वेळी घ्यावयाची काळजी या विषयी सविस्तर माहिती दिली. कीटनाशकाची फवारणी करताना हातमोजे घालने, तोंडाला मास्क लावणे, सोबतच फवारणी करताना संपूर्ण शरीर झाकलेले ठेवणे, हवेच्या विरुद्ध दिशेने फवारणी करू नये व घातक कीटनाशक कसे ओळखावे त्यांना कसे हाताळणे या गोष्टीबाबत आसोली येथे कृषी कन्यानी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

तसेच या अभ्यास दौप्यात मनोहरभाई पटेल कृषी महाविदयालयातील प्राचार्य डॉ. एस.सी अवताळे, राते प्रमुख आर. आर. कोवे व कार्यक्रम अधिकारी के. आर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

Share