पाठ्यक्रमासोबत पायाभूत शिक्षणावर भर द्या-इंजि.यशवंत गणविर
देवरी◼️ जिल्हा परिषद हायस्कूल देवरी येथे जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य इंजि यशवंत गणविर यांनी भेट दिली. सदर भेटीदरम्यान शाळेतील मुलभुत व भौतिक सुविधांची पाहणी केली.प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी हितगुज साधुन त्यांची शैक्षणिक प्रगती जाणुन घेतली.याचबरोबर दाखल खारीज रजिस्टर, शालेय पोषण आहार साठा रजिस्टर, विद्यार्थी पटसंख्या तपासणी केली. गरीब, कष्टकरी, शेतकरी व शेतमजुरांची पाल्य आपल्या शाळेत शिक्षण घेण्यासाठी येतात.त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी आपण विद्यार्थ्यांना योग्य अध्यापनासह योग्य मार्गदर्शन करावे जेणेकरून त्यांचे भविष्य उज्वल होईल.पाठ्यक्रमासोबत पायाभुत शिक्षणावर भर द्या, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे धडे देण्याची सुचना दिली. यावेळी गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे, केंद्रप्रमुख शिवकुमार राउत, रांकापा युवक जिल्हाउपाध्यक्ष युगेशकुमार बिसेन, नगरसेवक पंकज शहारे, राजु चांदेवार, चंद्रपाल शहारे, अमरदास सोनभोईर,गुंजन भाटिया,रवि इंगळे, चंद्रकांत कानेकर,सिटू भाटिया तथा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.