पोलीस हवालदार रामसिंग बैस एसीबी च्या जाळ्यात

गोंदिया 17: पोलीस स्टेशन गोंदिया (ग्रा) येथील पोलीस हवालदार रामसिंग बैस यांना 15000/- रु ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

तक्रारदारावर पो स्टे गोंदिया येथे दारूविक्री , शरीरावरील गुन्हे, कौटुंबिक भांडण व निवडणूक संबधी गुन्हे दाखल असून त्याला 2013 मध्ये जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे उपविभागीय अधिकारी गोंदिया यांनी आदेश दिले होते. याचे नागपूर खंडपीठाने मा न्यायालयाने हद्दपार चे आदेश रद्द केले होते.

या संबधित फोन द्वारे रामसिंग बैस पो ह यांनी पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या आदेशानुसार पोलीस आपणास सोबत घेऊन सांगितलेल्या ठिकाणच्या पोलीस स्टेशन ला सोडून देतील त्यामध्ये आम्ही तुम्हाला मदत करू त्याकरिता ठाणेदार साहेबाला 10000/- रु चा लिफाफा व मला 5000/- चा लिफाफा असे एकूण 15000/- रु रक्कमेची मागणी केली होती. रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्यामुळे गैरअर्जदार ने एसिबी कडे 17 जाने 2021 ला तक्रार केली . यावेळी सापळा रचून जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया समोरची चाय टपरीवर पोलीस हवालदार रामसिंग बैस बक्कल नं 1463 पो स्टे गोंदिया (ग्रा) यांना 15000/- ची लाच घेतांना रंगेहात पकडून कलम 7 ला.प्र.का. 2018 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कारवाई रश्मी नांदेडकर पोलीस अधीक्षक , राजेश दुधळवार अप्पर पोलीस अधीक्षक, मिलिंद तोतरे अप्पर पोलीस अधीक्षक ला प्र विभाग नागपूर, यांच्या मार्गदर्शनाखाली रमाकांत कोकाटे, पोउनि, शिवशंकर तुंबले स फौ, विजय खोब्रागडे, राजेंद्र शेंदरे, दिगंबर जाधव, नितीन रहांगडाले, राजेंद्र बिसेन, गीता खोब्रागडे, वंदना बिसेन यांनी केली.

Share