देवरी पोलिसांची गांजा तस्करावर मोठी कारवाई
देवरी – 16 मुख्य नियंत्रण कक्ष गोंदिया यांचे कडून प्राप्त माहितीच्या आधारे पोलिस स्टेशन देवरी पासून काही मिटर अंतरावर ट्रक क्रमांक CG -04-LR-2221 उभा असून त्या ट्रक मध्ये गांजा आहे अशी माहिती प्राप्त होताच वरिष्ठांना माहिती देवून व पोलिस अधीक्षक गोंदिया , अप्पर पोलिस अधीक्षक गोंदिया कॅम्प देवरी तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी देवरी यांच्या माग्दर्शनात सपोनि अजित कदम पोलिस स्टेशन स्टाफ सह शोधमोहीम राबविले असता देवरी येथील चीचगड रोड वर सम्राट बारच्या समोरील जिल्हा परिषदेच्या मैदानात उभा असल्याचे मिळून आले. नमूद ट्रक ची सरकारी पंचांच्या समोर पाहणी केली असता ट्रक च्या केबिन मध्ये एका पांढर्या रंगाच्या प्लॅस्टिक मध्ये तपकिरी रंगाचे 8 पुडके ज्यामधे 16 किलो 530ग्राम अंदाजे 1,32,240/- रु किमतीचे गांजा सदृश काळपट रंगाचा , उग्र वसाच्या कांड्या , पत्ते , चुरा , ओलसर असलेला अमली पदार्थ गांजा व ट्रक CG-04-LR-2221 अंदाजे 15 लक्ष रुपये असा एकूण 16,32,240/- रु च माल अवैद्य रित्या मिळून आल्याने पोलिस सस्टेशन देवरी येथे अपराध क्र. 20/2021 कलम 23 (बी ) ,21, 22 एन डी पी एस कडा 1985 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आळ असून सदर ट्रक मधील आरोपी (चालक ) फरार झाल्याने मिळून आलेले नाही . सदर ट्रक पोलिस स्टेशन ल जमा करण्यात आलेले आहे. आरोपीचा शोध व गुन्हाचा तपास सपोनि अजित कदम व चमू पोलिस स्टेशन देवरी करीत आहेत.