देवरी च्या बोटॅनिकल गार्डन चे वाजले तीन तेरा

शासनाच्या अभियानाचा उडाला फज्जा

सामाजिक वनीकरण विभागाचे दुर्लक्ष

डॉ. सुजित टेटे । प्रहार टाईम्स

गोंदिया: १६
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण विभाग गोंदिया परिक्षेत्र देवरी अंतर्गत लाखो रुपये खर्च करून स्व. उत्तमराव पाटील जैव विविधता वन उद्यानाची निर्मिती करण्यात आली.

देशात कोविड विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन घोषित झाले परंतु संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे जैविविधता संवर्धन महत्वाचे नसल्याचे चित्र देवरी येथे बघावयास मिळत आहे. त्याचा चांगलाच फायदा घेत सामाजिक वनीकरण विभाग परिक्षेत्र देवरी च्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी घेतल्याचे बघावयास मिळत आहे.

लाखो रुपये खर्च करून या जैवविविधता उद्यानाची निर्मिती करण्यात आली असून देवरी क्षेत्रातील लोकांसाठी आकर्षणाचा केंद्र ठरलेल्या उद्यानाकडे अधिकारी व कर्मचाऱ्या दुर्लक्षित कारभारामुळे संपूर्ण उद्यानातील विविध झाडे, फुल झाडे, औषधी वनस्पती नष्ट झालेले असून उद्यान ओसाड अवस्थेत पडून आहे.

उद्यानातील झाडांना पाणी घालण्यासाठी सुद्धा शासनाचे आदेश लागते का?

वृक्ष संवर्धन काळाची गरज असून त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य आहे का? असे प्रश्न उपस्थित झाले आले.

देवरीचे आकर्षणाचे केंद्र असलेला जैवविविधता उद्यान पुन्हा जिवंत होणार का ? या कडे सर्वांचे लक्ष आहे .

संबंधित विषयाची माहिती प्रहार टाईम्स च्या प्रतिनिधीने वन परिक्षेत्राधिकारी अविनाश मेश्राम(RFO) यांना विचारले असता त्यांनी उद्यान उघडण्याचे विभागाचे आदेश मिळाले नसून कुठलाही फंड उद्यानासाठी मिळालेला नाही त्यामुळे मजुरांना बंद केले असल्याचे त्यांनी सांगीतले असून पैशाची मागणी विभागाकडे केली आहे असे सांगीतले.

Share