देवरी पोलिसांची रेती तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टर जप्त

देवरी ◼️ तालुक्यात अवैद्य धंदयासह रेती तस्करी जोमात असल्याचे चित्र असतांना परीपोउपनि गीता काकासाहेब मुळे पोस्टे देवरी हे पोलीस स्टाफसह पोलीस स्टेशन हद्दीत पेंटोलीग करीत असतांनी गुप्त माहीतीच्या आधारे घटनेवेळी यातील आरोपी हा मौजा कन्हारपायली येथे त्याचे ताब्यातील टॅक्टर महिंद्रा युगो कंपनीचा लाल रंगाचा ज्याचा नंबर एमएच-३५ एजी – २८६६ व निळया रंगाची टॉली जिचा नंबर एमएच – ३५ फ – ३५८४ अंदाजे किंमती २,६०,०००/–रू व त्या मध्ये १ बास रेती अंदाजे किमती ३,००० /- रू असा एकुन २,६३,००० /- रू चा माल विना परवाना अवैद्यरित्या वाहतुक करतांनी मिळुन आल्याने फिर्यादीचे लेखी रिपोर्टवरून पोस्टे देवरी येथे अप क्र. ३२१ / २०२३ कलम ३७९ भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास सफौ / ६६९ कुंभरे पोस्टे देवरी, हे करीत आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share