नगरपंचायत देवरीच्या इंडियन स्वच्छता लीग २ मोहिमेत सहभागी व्हा: प्रणय तांबे मुख्याधिकारी

देवरी ◼️केंद्र शासनाच्या सूचनेनुसार 17 सप्टेंबर तें 2 ऑक्टोबर पर्यंत स्वच्छता पंधरवाडा मोहीम राबवायची आहे त्या अनुषंगाने इंडियन स्वच्छता लीग2 मोहिमे अंतर्गत नगरपंचायत देवरी तर्फे देवरी शहरात नगरपंचायत क्रिडांगणा येथे दि. 20/09/2023 ला दुपारी 3 वाजता स्वच्छता कार्यक्रम राबविण्याचे आयोजन नगरपंचायत देवरी अंतर्गत करण्यात येत आहे.

सदर मोहिमेमधे शहरातील मान्यवर पदाधिकारी, सर्व कर्मचारी, तसेच सर्व शालेय विद्यार्थी, शिक्षक कर्मचारी वृंद , सर्व देवरी शहरवासियांनी जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहून स्वछता अभियानात सहभाग घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी प्रणय तांबे यांनी केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share