देवरी पोलिसांचे शहरात पथसंचलन

◼️उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीसनिरीक्षकांचा सहभाग

देवरी ◼️आगामी काळात साजरे करण्यात येणारे सण उत्सव शांततेत व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी तसेच सण उत्सव काळात जिल्हयात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी देवरी पोलिसांनी रूटमार्च काढून जनजागृती केळी. दरम्यान पोलीस स्टेशन देवरी अंतर्गत देवरी शहरातील मुख्य मार्गाने चिचगडरोड , बाजार लाईन, दुर्गाचौक, मस्जित कारगील चौक, गणेश चौक , पंचशिल चौक १, मसक-या चौक, बौध्द विहारपर्यंत रुट मार्च पथसंचलन करण्यात आले. सदर पथसंचलन दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी देवरी, पो. नि. प्रविण डांगे देवरी , सपोनि. आनंदराव घाडगे , जाधव पोलीस स्टेशन देवरी व २३ पोलीस अंमलदार व २७ गृहरक्षक हजर होते.

सदर पथ संचलनाला निखिल पिंगळे पोलीस अधिक्षक गोंदिया यांच्या आदेशान्वये अशोक बनकर अपर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी व संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांचे मार्गदर्शन लाभले.

Print Friendly, PDF & Email
Share