सर्व जागांवर बीआरएस स्वबळावर लढणार

गोंदिया◼️ महाराष्ट्रात पुढील राजकारण तेलंगाना पॅटर्नचा असेल. तेलंगानाच्या धर्तीवर येथील शेतकरी व इतर समाजबांधवांकरिता योजना राबविल्या जाणार आहेत. याकरिता महाराष्ट्रात बीआरएस पक्षातर्फे संपूर्ण विधानसभेच्या 288 जागांसह लोकसभेच्या 48 जागा स्वःबळावर लढण्याचा निर्धार करण्यात आला असल्याचे बीआरएसचे विभागीय समन्वयक तथा तुमसर-मोहाडीचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी सांगीतले. ते येथील शासकिय विश्रामगृहात बीआरएस पक्षाच्या संगठनात्मक बांधणीचा आढावा घेण्याकरिता आले असता आयोतिज पत्रपरिषदेत बोलत होते. वाघमारे पुढे म्हणाले, पक्ष सदस्य नोंदणी व संगठनात्मक बांधणीवर जोर दिला जात आहे. प्रत्येक विधानसभा निहाय 25 हजार सदस्य नोंदणीचा लक्ष आहे. तेलंगानाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्हयात येत्या काळात दौरे करणार आहेत.

या दरम्यान सभा, रोडशो, कार्यकर्ता मेळावे त्यांच्या उपस्थित होणार असल्याचे वाघमारे म्हणाले. या माध्यमातुन चंद्रशेखरराव जनतेला तेलंगाना मिशन समजावून सांगतील. महाराष्ट्रात सत्ता स्थापन झाल्यास येथेही तेलंगणा पॅटर्न राबविणार असल्याचे त्यांनी सांगीतले. बीआरएस लहान राज्याचा पक्षधर आहे. वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी जनतेकडून आल्यास जाहीरनाम्यात समाविष्ट करू, असेही वाघमारे म्हणाले. BRS भोपाल येथील एका मेळाव्यात पंतप्रधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भ्रष्टाचारी म्हणात व चार दिवसानंतर राष्ट्रवादीचे अजीत पवार राज्यातील भाजप-सेनेच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदीची शपथ घेतात. याला काय म्हणावे? महाराष्ट्रातील जनतेनेच याचा विचार करावा. संसदेचे विशेष अधिवेशनात वन नेशन वन इलेक्शनवर चर्चा होणार आहे. असे झाले तर बीआरएस चर्चेस तयार असल्याचे ते म्हणाले. भाजप विचारधारेची पार्टी राहिली नाही, भाजपमध्ये अटलजी, आडवाणीजींचे सर्वसमावेशक विचार चालत नाही तर आज मोदीजींची हुकुमशाही चालते, लहान कार्यकर्त्यांचे ऐकले जात नाही, म्हणून मी भाजप सोडून बीआरएस पक्षाशीच एकनिष्ठ राहाण्याचे ठरविल्याचे वाघमारे म्हणाले. यावेळी गोंदिया जिल्हा सह समन्वयक राजेश चांदेवार, अर्जुनी मोरगाव विधानसभा समन्वयक रमेश चिल्लारे, तिरोडा विधानसभा समन्वयक बबलु बैस, आमगावचे ब्रजभूषण बैस, अ‍ॅड. वसीम आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share