ब्लॉसम स्कुलमध्ये जन्माष्टमी उत्साहात साजरी

देवरी : ब्लॉसम पब्लिक स्कुल देवरी येथे कृष्णा जन्मोत्सव प्राचार्य डॉ सुजित टेटे यांच्या मार्गदर्शनाखाली थाटात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. सुजित टेटे , वैशाली मोहूरले, सरिता थोटे प्रामुख्याने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमामध्ये ब्लॉसम नर्सरी केजी चे छोटे राधाकृष्ण आकर्षक वेशभूषेत सहभागी झालेले होते. स्पर्धेच्या नियमाप्रमाणे परीक्षण करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून वैशाली मोहुरले आणि सरिता थोटे यांनी भूमिका पार पाडली. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, पेन्सिल, चॉकलेट वितरण करण्यात आले. कृष्णाच्या वेशभूषेत सहभागी झालेले गोविंदानी दही हंडी फोडली आणि उत्साहात जन्माष्टमी साजरी केली. सदर कार्यक्रमाच्या यशासाठी शिक्षक नितेश लाडे, विश्वप्रित निकोडे, अजित टेटे, कलावती ठाकरे, मनीषा काशीवार , प्रियांका अंबिलकर, राहुल मोहुर्ले , नलू टेंभरे, तेजस्विनी नंदेश्वर सह सर्व शिक्षकांनी सहकार्य केले. कार्यक्रमात पालकांनी उत्साहात सहभाग घेतला. सूत्रसंचालन जिया राऊत हिने केला असून आभार प्रदर्शन श्रुती राठोड हिने मानला.

Print Friendly, PDF & Email
Share