सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगाव यांचे वतीने शिक्षक दिन उत्साहात साजरा
गोठणगाव ◼️सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांव हददीमधील विविध शाळांमध्ये शिक्षक दिन उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांव अंतर्गत असलेल्या अतिदुर्गम व अतिसंवेदनशिल असलेल्या जि.प. प्राथमिक शाळा गंधारी येथील शिक्षक श्री कापगते व श्री डाखोळे यांचा तसेच जि.प. प्राथमिक शाळा, उमरपायली येथील शिक्षक श्री गेडाम यांचा सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांव चे प्रभारी अधिकारी सपोनि सचिन घाटे, पो.उप.नि. शुभम नवले यांचे हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. सदर प्रसंगी उमरपायली येथील शिक्षक श्री गेडाम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगीतले की, पोलीस दलाच्या वतीने आमचा झालेला हा सत्कार आमच्यासाठी आनंदाची व अभिमानाची बाब आहे. तसेच आदिवासी विकास हायस्कूल गोठणगाव येथील शिक्षकांचा सुध्दा सत्कार करण्यात येवून शाळेतील विदयार्थ्याकरीता निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाकरीता सशस्त्र दूरक्षेत्र गोठणगाव येथील पोहवा पुराम, मिसार, थेर पोना वालदे, कमलेश राउत, पोशि गबने, लिल्हारे व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाला निखील पिंगळे पोलीस अधिक्षक गोंदिया, अशोक बनकर , अपर पोलीस अधिक्षक गोंदिया कैंप देवरी, संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग देवरी यांचे मार्गदर्शन लाभले.