पोलीस निरीक्षकाला १० हजाराची लाच भोवली, ACB ची कारवाई !

भंडारा पोलिस स्टेशन येथिल सहायक पोलिस निरीक्षक याला लाच स्वीकारताना अटक , 10 हजार रुपयांची मागितली होती लाच

भंडारा :भंडारा शहर पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या सहायक पोलिस निरीक्षक यांना लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. तक्रारदार यांचा मुलास इतर तीन मुलांवर कलम 304, 279,337,338 अंतर्गत गुन्हा दाखल असून तक्रारदार यांच्या मुलाचा शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यासाठीच मुलाचे नाव वगळायचे असल्यास 15 हजार रुपयांची मागणी सहायक पोलिस निरीक्षक राजेश साठवणे यांनी केली होती. पण तडजोडी अंती 10 हजार रूपये घेण्याची इच्छा दर्शविली. पण तक्रारदार यांची लाच देण्याची मुलीचं इच्छा नसल्याने त्यांनी याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून 10 हजार रूपये लाच स्वीकारताना रंगे हाथ अटक केली आहे. आरोपी सहायक पोलिस निरीक्षक यांच्या विरूद्ध भंडारा शहार पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, अपर पोलीस अधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के, डॉ.अरुणकुमार लोहार, अमित डहारे, संजय कुंजरकर, गोस्वामी, अतुल मेश्राम, मिथुन चांदेवार,चेतन पोटे,मयूर शिंगणजुडे, विवेक रणदिवे, राजकुमार लेंडे, अंकुश गाढवे, विष्णू वरठी, राहुल, अभिलाषा गजभिये यांनी केली.

Share