विद्यार्थी जीवनात वेळेचा सदुपयोग करणे काळाची गरज- संजय उईके

● सार्व.वाचनालय व अभ्यासिका केंद्राचा ६ व वर्धापन दिन आणि यशवंतांचा सत्कार समारोहाचे आयोजन.

देवरी- सध्याच्या विज्ञान आणि तंत्रज्ञाना सोबतच स्पर्धेच्या या युगात स्पर्धा परीक्षा आणि इतर परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासमोर अनेक आवाहने उभी आहेत त्या आवाहनांना मागे टाकत,विद्यार्थी जीवनात ठरवलेले ध्येय गाठण्यासाठी वेळेचा सदुपयोग करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन नगरपंचायत देवरी चे अध्यक्ष संजय उईके यांनी स्थानिक देवरी येथील दुर्गा चौक येथे नगरपंचायत कार्यालय देवरी आणि दिनबंधु ग्रामीण विकास संस्था देवरी यांच्या संयुक्त विद्यमाने संचालित सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिका केंद्र देवरी द्वारा आयोजित सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिका केंद्राचा ६ वा वर्धापन दिन आणि स्पर्धा परीक्षा व इतर परीक्षेत यशवंत झालेल्या यशवंतांचा सत्कार समारंभाप्रसंगी केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून
दिपप्रज्वलानी कार्यक्रमाची सुरवात झाली.यावेळी विशेष अतिथी म्हणून नगर पंचायतच्या उपाध्यक्ष प्रज्ञाताई संगीडवार, सभापती नूतनताई सयाम, कमलाताई मेश्राम तर प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यादोराव पंचमवार, दिपक अग्रवाल,नगरसेविका सीताबाई रंगारी,संस्थेचे अध्यक्ष कुलदिप लांजेवार,देवानंदजी मेश्राम आदि मान्यवर उपस्थित होते.दरम्यान अभ्यासिका केंद्रामध्ये सातत्याने अभ्यास करून भारतीय वायुसेनेतील मल्टी टास्किंग स्टाफ या पदावर निवड झालेले यशवंत रोहित ब्राह्मणकर, इयत्ता दहावीच्या शालांत परीक्षेत तालुक्यातून द्वितीय आलेली जानवी शाहू, महसूल विभागाच्या कोतवाल या पदासाठी झालेला परीक्षेत सर्वात जास्त गुण मिळवून यशवंत झालेले सुनील उके या तिन्ही यशवंतांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या सोबतच उपस्थित मान्यवरांकडून मार्गदर्शन होत असताना श्री यादोराव पंचमवार बोलले की शहरात असणाऱ्या अभ्यासिका केंद्रामध्ये आपल्या क्षेत्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश घेणे शक्य नसल्याने त्यांना मदत व्हावी हेतूने या अभ्यासिका केंद्राची स्थापना करण्यात आली आणि या त्यामुळे या अभ्यासिका केंद्राचे महत्व समजून घेत विद्यार्थ्यांनी आपल्या पुढील आयुष्यात भरघोश संपादन करावे असे प्रतिपादन करत पुढील वाटचाली करता शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अभ्यासिका केंद्रातील अभ्यासकांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष कुलदीप लांजेवार यांनी केले तर संचालन ग्रंथपाल हर्षवर्धन मेश्राम यांनी आणि आभार संस्थेचे विश्वस्त दिपक लांजेवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे विश्वस्त, स्वयंसेवक आणि अभ्यासिका केंद्रातील अभ्यासकांनी सहकार्य केले.

Print Friendly, PDF & Email
Share