जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा धमदीटोला येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा

Deori: जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा धमदीटोला येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी सोहळा मोठ्या उत्साहाने साजराकरण्यात आला. या प्रसंगी शिलालेख उद्घाटन, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, ध्वजारोहण कार्यक्रम, विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम, इत्यादी उपक्रम राबवण्यात आले.
संदीपभाऊ भाटियाकांग्रेसअध्यक्ष देवरी तालुका, अनुसयाताई सलामेपंचायत समिती सदस्य मिसपिरी,जीवनभाऊ सलामेउपसरपंच मिसपिरी, खेमराजभाऊ वालदेग्रा.. सदस्य मिसपिरी ,सुरेशजी वाघमारेग्रामसेवक मिसपिरी यांच्या सहकार्यातून सर्व विद्यार्थ्यांना मोफत कोट ( blazer) वाटप करण्यात आले.शालेय विद्यार्थ्यांना गोड जेवणाची सोय करण्यात आली.आदिवासी बहुल अतिदुर्गम भागात या प्रकारचे सहकार्य करण्याचे धाडस मान्यवरांनी दाखवले त्याबद्दल शालेय प्रशासनाच्या वतीने सर्वांचे आभार मानून यापुढेही शाळेला लागेल ते सहकार्य करण्याची हमी देण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद सयाम सर यांनी केले.शाळेचे मुख्याध्यापक दिपक लांजेवार सर यांनी शाळेतील बदलत असलेल्या गुणवत्तेबद्दल चर्चा व भविष्यातील करावयाच्या बदलाबद्दल उद्बोधन आपल्या प्रास्ताविकात केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. दुर्गेशजी कुंभरे यांनी पालकांना गुणवत्ता वाढीसाठी करावयाच्या उपाययोजना यावर मार्गदर्शन केले.श्री.धन्नालालजी सयाम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांनी शाळेतील समस्या व गुणवत्ता वाढीसाठी कटिबद्ध असल्याचे जाहीर केले.उपस्थित मान्यवरांनी शाळेतील बदलत्या परिस्थितीचे कौतुक करून यापुढे शाळेला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी गोमेशजी वाल्दे ,खेमराजजी वाल्दे,अनिलजी दुग्गा,सुखरामजी कुंभरे,ओंगनुजी वाल्दे,आत्मारामजी मडावी,रोशनजी सुरसावंत,उमादासजी वाल्दे,ललेश्वर्जी बघवा,भोलारामजी मडावी,दयालुजी कुंजाम,पर्मेशबाई कुंभरे, शांतिबाई मडावी,पनियाबाई नरेटि,नागेश्वरी कुंभरे,लिलाबाई वाल्दे,सुकैबाई कुंभरे,सीमाबाई मडावी,
किशोर जी नरेटि इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन खुमन सलामे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार सुजित सूर्यवंशी यांनी केले. उपस्थित सर्वांना चहा व नास्ता देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Share