देवरी तालुका पत्रकार संघाच्या भवनात ध्वजारोहण

देवरी येथील देवरी तालुका पत्रकार संघाच्या भवनात भारताच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण ध्वजारोहण करण्यात आले.
सदर ध्वजारोहण पत्रकार संघाचे अध्यक्ष ॲड. प्रशांत संगीडवार यांच्या अध्यक्षतेखाली सचिव सुरेश चन्ने यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी कार्याध्यक्ष चंचल जैन, उपाध्यक्ष जुबीन खान, सुरेश साखरे, सहसचिव सुरेश भदाडे, कोषाध्यक्ष सुनिल चोपकर, प्रचार प्रसार सहप्रमुख संजय तरोणे, संघटक देवेंद्र सेलोकर, संजय मलेवार आणि शाहिद पठाण आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

सरस्वती शिशु मंदिर देवरी
देवरी येथील दिशांत शिक्षण संस्था अंतर्गत सरस्वती शिशु मंदिरात संस्थेचे सहसचिव छोटेलाल बिसेन यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ सल्लागार सदस्य ॲड. प्रशांत संगीडवार यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष सुमन बिसेन, प्रधानाचार्य सुरेश चन्ने, अनेक पालक बंधू – भगिनी आणि सर्व कर्मचारी वर्ग आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share