ब्लॉसम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी केला ध्वजारोहन

देवरी: 15ऑगस्ट
स्थानिक ब्लॉसम पब्लिक स्कूल देवरी येथे आपली परंपरा कायम ठेवत विद्यार्थ्यांच्या हातून ध्वजारोहन करण्यात आला. विद्यार्थ्यांना खऱ्या लोकशाहीचे धडे शाळेतच शिकायला मिळायला पाहिजे आणि देशाविषयीचा अभिमान शालेय पातळीवरचं जागृत झाला पाहिजे या उद्देशाने प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांनी शालेय निवडणूक अगदी राजकीय पद्धतीनुसार लढविली होती. निवडणुकीत विजयी झालेले विध्यार्थी प्रतिनिधी श्रुती राठोड आणि आयुष घोडेस्वार या विद्यार्थ्यांच्या हस्ते शाळेत ध्वजारोहण पार पडले.
या प्रसंगी व्यासपीठावर मुख्य अतिथी म्हणून * डॉ. सुजित टेटे, विद्यार्थिनी प्रतिनिधी श्रुती राठोड आणि आयुष घोडेस्वार उपस्थित होते.
नियोजित वेळेवर शालेय पटांगणावर विध्यार्थ्यांनी ध्वजारोहण केला. स्वागतगीत, देशभक्ती गीत गायन करून विध्यार्थ्यांनी देशाविषयची भावना व्यक्त केली.

विध्यार्थी जीवनात खरी लोकशाहीची बीजे रोवली जावी , एखाद्या आमदार खासदार प्रमाणे विध्यार्थ्यांना सुद्धा ध्वजारोहण करता यावी, देशा विषयीचा आदर आणि अभिमान शालेय जीवनापासून चिरकाल टिकून राहावे या संकल्पनेतून सदर ध्वजारोहण सोहळा पार पडला.

सूत्रसंचालन जिया राऊत आणि प्रीती मेश्राम नी केला आभार प्रदर्शन मातृज जनबंधू यांनी मानला. कार्यक्रमाच्या यशासाठी सर्व शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचाऱ्यांनी आणि पालकांनी सहकार्य केला.

Print Friendly, PDF & Email
Share