हायवे गृप देवरी तर्फे उद्या होणार देवरी नगरपंचायतीस रुग्णवाहिका (ऍम्बुलन्स) समर्पित

देवरी ◼️ हायवे गृप देवरी तर्फे देवरी नगरातील नागरिकांसाठी रुग्णवाहिका समर्पित कार्यक्रमाचे आयोजन १३ ऑगस्ट ला करण्यात आले असून स्व. संकेत रमेश फुके यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त गोर-गरीब जनता व गरजू लोकांना मदतरूपी उपयोगी पडावी याकरीता हायवे गृप देवरी तर्फे देवरी नगर पंचायतीस रुग्णवाहिका (ऍम्बुलन्स) समर्पित करण्याचा कार्यक्रम आयोजीत केलेला आहे.

सदर रुग्णवाहिका रमेश फुके व रमाताई फुके यांच्या शुभहस्ते समर्पित करण्यात येणार असून यावेळी डॉ. परिणयजी फुके माजी पालकमंत्री गोंदिया , संजयजी पुराम माजी आमदार, आमगांव-देवरी , संजु उईके नगराध्यक्ष, न.पं.देवरी, विरेंद्र अंजनकर संघटनमंत्री भाजपा गोंदिया-भंडारा, अनिलककुमार येरणे ता. अध्यक्ष भाजपा देवरी, प्रज्ञा प्रमोद संगिडवार उपाध्यक्षा, न.पं. देवरी, प्रणय तांबे मुख्याधिकारी, न.पं.देवरी सर्व सभापती आणि नगरसेवक नगर पंचायत देवरी यांच्यासह हायवे गृप, देवरीचे संचालक विजय तुळशिरामजी गहाणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

Print Friendly, PDF & Email
Share