मानसिक तणावामुळे मिसींग झालेल्या व्यक्तीचा सलग 5 तास शोध घेवून केले परिवाराचे सुपुर्द

◼️पो . ठाणे केशोरी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

Gondia ◼️ 11/08/ 2023 रोजी चे सायंकाळी 06.00 वाजता दरम्यान एक 35 वर्षे वयाचा व्यक्ती मिसिंग झाल्याबाबतची तक्रार केशोरी पोलीस स्टेशनला आली. ती मिसिंग व्यक्ती फोनवर बोलत असून कर्जामुळे आत्महत्या करणार असल्याचे तक्रारदार ने सांगितले. अशी तक्रार येताच पो. ठाणे केशोरीचे ठाणेदार सपोनि- कदम यांनी स्वतः त्या मिसिंग व्यक्तीशी बोलले परंतु तो व्यक्ती कोणताच प्रतिसाद न देता अजिबात ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्यावरून त्या मिसिंग व्यक्तीची लोकेशन बाबत तांत्रिक माहिती घेण्यात आली असता त्या व्यक्तीचे लोकेशन तळोदी जिल्हा चंद्रपूर येथील दाखवत होते. त्यामुळे त्या व्यक्तीचे शोधाकरीता एक पथक तात्काळ तळोदीकडे रवाना करण्यात आले. व तात्काळ पो.ठाण्यास मिसिंग दाखल करण्यात आले.

मिसिंग व्यक्तीचे तांत्रीकदृष्टया लोकेशन बाबत माहिती घेत असताना मिसिंग व्यक्ती तळोदीहून नागभीड व तिथून ब्रह्मपुरी आल्याचे समजले. त्यावरून सदर व्यक्ती कोणत्यातरी ट्रेन मध्ये असल्याचे समजले. ट्रेन ची माहिती प्राप्त केली असता त्या वेळेमध्ये चांदा ते जबलपूर एक्सप्रेस जात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे सदर बाबत तात्काळ वडसा आर.पी.एफ, अर्जुनी/ मोर रेल्वे स्टेशन, यांचेशी संपर्क साधण्यात आला स्टेशनवर केशोरी पोलीस स्टेशनची टीम, गोरेगाव येथे API गोसावी, गोंदिया शहरचे PI सूर्यवंशी साहेब, गोंदिया आर.पी.एफ.चे अधिकारी या सर्वांना मिसिंग व्यक्तीची सर्व माहिती व फोटो पाठवून त्याठिकाणी रेल्वे तपासणी करण्याची विनंती केली. त्या सर्वांनी प्रत्येक रेल्वे स्टेशनवर पोलीस पाठवून मिसिंग व्यक्तीचे सातत्याने लोकेशनद्वारे शोध घेत असताना ती मिसिंग व्यक्ती वडसा, अर्जुनी, सौंदंड व पुढे पांढरी असे जात असल्याचे दिसले. त्यावरून पोलीस तपास पथक हे बाय रोड त्याचा पाठलाग करत होते. व्यक्ती ती रेल्वे स्टेशन गोंदियावर पोहोचली परंतु तो व्यक्ती तिथे मिळून आला नाही. पांढरी येथून पुढे त्या व्यक्तीचे लोकेशन मिळत नव्हते. म्हणून आमचे तपास पथक पांढरी रेल्वे स्टेशनवर गेले. त्या ठिकाणी शोध घेतल्यानंतर तो व्यक्ती पांढरी गावातून चालत जात असताना मिळून आला.

त्याला लगेच ताब्यात घेऊन पोलीस पथक केशोरी पोलीस स्टेशनला परत आले. व त्या मिसिंग व्यक्तीला त्याच्या कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आले आहे. सलग 5 तासाचे पाठलाग करून केलेले शोधकार्य आणि सदर शोधकार्यात मदत करणारे पोलिस अधिकारी अंमलदार यांनी केलेली मदत यामुळे केशोरी पोलीस स्टेशनच्या पोलीस तपास पथकाने मिसिंग व्यक्तीला शोधून काढून त्याचा जीव वाचवला त्याला त्याच्या कुटुंबाच्या ताब्यात दिले. मिसिंग व्यक्ती चा अथक परिश्रम घेवून तत्परतेने शोध घेण्याची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक गोंदिया निखिल पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया, अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, देवरी संकेत देवळेकर, यांचे मार्गदर्शनाखाली केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सपोनि सोमनाथ कदम, पो. हवा. चंद्रकांत भोयर, हसील भांडारकर, रेवनाथ मारबाते, यांनी केली. सदर शोधकार्यात सायबर सेल गोंदियाचे पो.हवा. दीक्षित दमाहे यांनी तांत्रिक माहिती वेळेत पुरवून मोलाची कामगिरी बजावली आहे.

Share