पोलिस दादालोरा खिडकी योजने अंतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन
चिचगड पोलिसांचा स्तुत्य उपक्रम
देवरी ◼️गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त आदिवासी क्षेत्रातील गोरगरीब जनतेच्या हिताकरिता गोंदिया जिल्हा पोलिस दल कटिबध्द असून पोलीस दादालोरा एक खिडकी योजनेच्या माध्यमातून प्रभावीपणे कार्य करीत असून सदर योजना राबविण्यात येत आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी, यांचे मार्गदर्शनाखाली “पोलिस दादालोरा एक खिडकी” ‘एक हात मदतीचा ‘ योजने अंतर्गत पोलीस स्टेशन चिचगड तर्फे शासकीय आश्रम शाळा, कडीकसा येथे दि- 08/08/023 रोजी, आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात येवून विद्यार्थ्यांंचा मोफत उपचार करण्यात आला.
पोलीस अधीक्षक गोंदिया निखिल पिंगळे, यांच्या संकल्पनेतून व अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, यांचे मार्गदर्शनाखाली पो. ठाणे चीचगड चे ठाणेदार शरद पाटील, डॉ. शहारे, डॉ. कुकडे तसेच वैद्यकीय स्टॉफ व ईतर पोलिस स्टॉफ हजर होते. शाळेचे प्राचार्य मेश्राम सर, व ईतर शिक्षक यांनी पोलीस विभागाचे खुप आभार मानलेत.