हेल्मेट जनजागृती करुन केली विद्यार्थ्यांमधे नीतिमूल्यांची रुजवणुक, चिचगड पोलिसांचे अभिनव उपक्रम

देवरी / चिचगड ◾️पोलीस स्टेशन चिचगड अंतर्गत एकलव्य केंद्रीय आश्रम शाळा, बोरगाव/बाजार व श्रीराम विद्यालय चिचगड येथे शाळेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये चांगले नीतिमूल्ये रुजवून त्यांना जबाबदार नागरिक बनवणे तसेच वाहतुकीचे नियम, “हेल्मेट जनजागृती”, याबाबतीत ठाणेदार शरद पाटील यांनी शालेय विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले,यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. विद्यार्थी हे देशाचे भवितव्य पर्यायाने समाजाचे उद्याचे चांगले नागरिक असतात, त्यांना चांगल्या नवनवीन गोष्टी व सोशल मीडियाचा चांगला वापर करून स्वतःचे हित जोपासण्यासाठी योग्य ते प्रयत्न करावेत.

1)बाल लैगिक अत्याचार,ऑनलाईन फसवणूक, 2)सायबर क्राईम बाबत माहिती, 3)महिला सुरक्षितता 4)रस्ते अपघात व नियम जागरूकता 5) कोणत्याही व्यसना पासून दुर राहावे. या बद्दल माहिती यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना दिली.

सदर कार्यक्रमाला पोलिस अधीक्षक गोंदिया निखिल पिंगळे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली, अप्पर पोलीस अधीक्षक,
अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी विजय भिसे यांचे मार्गदर्शन लाभले.

Share