भंडारा ◾️’बोरा’ चे वाजले बारा ! दोघांना अटक

भंडारा◾️झटपट पैसे कमवण्याच्या नादात स्वतःचे नुकसान करून बसण्याचा प्रकार बोरा बँड ऑनलाइन ट्रेडिंग साईटच्या निमित्ताने पुढे आला असून याप्रकरणी आता भंडारा शहरातील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी एकाला पोलिसांनी अटक केली असून एक फरार असल्याचे पोलिस अधीक्षक लोहित मतांनी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मागील काही महिन्यांपासून भंडारा शहरात बोराणे धुमाकूळ घातला असून पैसे दुप्पट होण्याच्या प्रलोभनापायी कोट्यावधी रुपयाची गुंतवणूक लोकांनी यात केल्याचे जोरदार चर्चा आहे. अनेक ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून केलेली गुंतवणुक पैसे झटपट दुप्पट करते असा प्रचार करून लोकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले जाते. लोकही प्रलोभनापायी जवळ असलेला पैसा, प्रसंगी कर्ज घेऊन आणि मालमत्ता विकून यात गुंतवणूक करण्यास मागेपुढे पाहत नाहीत.

काही महिन्यांपासून भंडारा शहरात बोरा बँड ऑनलाइन ट्रेडिंग ॲप चे प्रचंड वाढले आहे. या ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने ट्रेडिंग केल्यास चाळीस दिवसात पैसे दाम दुप्पट होतात, असे वातावरण निर्माण करण्यात आले. या प्रलोभनाला शहरातील तरुणच नाही तर नोकरदार, व्यवसायिक, व्यापारी आणि डॉक्टर मंडळींनी बळी पडली. सुरुवातीला काही लोकांना मागील काही दिवसांपासून ही ऑनलाईन साईट बंद पडली आहे. Bora bell त्यामुळे लोकांची फसवणूक झाल्याचे लक्षात येऊन पीडित आता पोलिसांकडे धाव घेत आहेत. अशाच एका भंडारा पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या पवन मस्के यांच्या तक्रारीवरून नागरिकांना प्रलोभन देऊन गुंतवणूक करण्यास तयार करणारे आणि या ॲपचा प्रचार प्रसार करणारे किशोर कुंभारे व विकी झाडे या दोघांविरुद्ध कलम 420, 406, 34 व सहकलम 3 महाराष्ट्र ठेवीदारांचा अधिनियम 1999 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

गुन्हा दाखल झालेल्या किशोर कुंभारे याला पोलिसांनी अटक केली असून विकी झाडे हा फरार असल्याचे पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. कुणीतरी हे ॲप तयार करून त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी एजंट स्वरूपात सुरुवातीला काही लोकांना नेमले जाते. बसावा म्हणून या नियुक्त लोकांना पैसे गुंतविण्यास सांगून ते दुप्पट केले जातात. Bora bell हाच दाखला देत नंतर या लोकांकडून समाजातील इतर नागरिकांनाही प्रलोभन देत गुंतवणूक करण्यास भाग पाडले जाते. या तक्रारीनंतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने आता सखोल चौकशी करण्यात येईल. गुन्हा दाखल असलेल्या आरोपींचे बँक खाते गोठविण्यात येतील. सोबतच ज्या लोकांशी या पैशाच्या माध्यमातून व्यवहार केला गेला असेल त्यांचेही खाते उठवून पीडित लोकांना पैसे दिले जातील अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली. यात फसवणूक झालेल्या नागरिकांनी जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करावी आणि आपले बयान नोंदवावे. ज्या कुणी आपणास पैसे जमा करण्याचा आग्रह केला असेल अशांची नावे पोलिसांना सांगावी असेही पोलीस अधीक्षकांनी सांगितले. या व्यतिरिक्त इतर कुठल्याही ऑनलाईन ॲप द्वारा केलेल्या गुंतवणुकीत फसवणूक झाली असेल तर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी यावेळी केले आहे. पत्रकार परिषदेला अतिरिक्त पोलीस अधीक्षक कातकेडे उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share