पोलिसांनी केले नक्षलग्रस्त भागातील आदिवासी शेतकऱ्यांना धान बिजाई चे वाटप, पोलीस अधीक्षकांची उपस्थिती

देवरी ◾️ तालुक्यातील चिचगड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पिपरखारी AOP येथे निखिल पिंगळे (IPS) पोलिस अधीक्षक गोंदिया यांच्या संकल्पनेतून अशोक बनकर, अप्पर पोलीस अधीक्षक, (कॅम्प) देवरी , संकेत देवळेकर.उपविभागीय पोलीस अधिकारी देवरीयांचे मार्गदर्शनाखाली “पोलिस दादालोरा खिड़की” ‘एक हात मदतीचा’ उपक्रमांतर्गत दिनांक 06/07/2023 रोजी नक्षलग्रस्त आदिवासी भागातील मौजा-(बिचटोला) येथील पुरुष व महिला शेतकरी यांना पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या हस्ते (धान बीजाई ) पेरणी च्या अनुशंगाने वाटप करण्यात आले यावेळी पोलीस अधीक्षक यांनी या भागातील शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन केले व पारंपारिक शेती सोबत आधुनिक शेतीला प्राधान्य द्यावे व शासनाच्या कृषी विषयक विविध योजना या पोलिस विभाग “पोलिस दादालोरा खिडकी” च्या माध्यमातून आपल्या दारी पोहोचविण्यासाठी प्रयत्न करतील यावेळी ‘बीचटोला’ पिपरखारी येथील शेतकरी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. तसेच यावेळी नवनिर्मित AOP “पिपरखारी” येथे मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले याठिकाणी अनेक प्रकारचे वृक्ष लावण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशासाठी पोलीस स्टेशन चिचगड प्रभारी अधिकारी शरद पाटील, AOP पिपरखारी प्रभारी जानकार, पोलिस उपनिरीक्षक मटामी, पोलीस स्टाफ तसेच परिसरातील शेतकरी व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share