पीक कर्ज वाटपात जिल्हा बँक आघाडीवर

गोंदिया◾️शेती करताना शेतकर्‍यांना आर्थिक अडचणी भासू नये यासाठी शासनाच्या माध्यमातून जिल्हा, राष्ट्रीयकृत, ग्रामीण व खाजगी बँकांच्या मार्फत पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 35 हजार 540 सभासदांना 194.45 लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. उद्दिष्टाच्या 59.50 टक्के पीक कर्जाचे वाटप 30 जूनपर्यंत झाले आहे.

दर हंगामाप्रमाणे यंदाही पीक कर्ज वाटपात व्यापारी, ग्रामीण बँका उदासीन असल्याचे दिसून येते. जिल्हा बँकेला 32679 लाख रुपयाचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट यंदाच्या खरीप हंगामात आहे. 30 जूनपर्यंत जिल्हा बँकेने 35 हजार 540 सभासदांना 194.45 लाख रुपयांचे पीक कर्ज वितरित केले आहे. जे उद्दिष्टेचा 59.50 टक्के आहे. कर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बँका अद्यापही माघारलेल्या आहेत. व्यापारी बँकांना 17262 लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. पैकी 2849 शेतकर्‍यांना 2364 लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. तर ग्रामीण बँकांना 6985 लाख रुपये पीक कर्जाचे वाटप यंदाच्या खरीप हंगामात करायचे आहे पैकी 3343 शेतकरी सभासदांना 2898 लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे.

Share