सुदृढ आरोग्यासाठी योगाभ्यास करणे महत्त्वाचे- यादोराव पंचमवार

●तालुका क्रीडा संकुल देवरी येथे आंतरराष्ट्रीय योगदिनाचे आयोजन●

देवरी- मानवी जीवनातील दैनंदिन जीवन शारीरिक आणि मानसिक रित्या सुदृढ रहाण्यासाठी दैनंदिन जीवनात योगाअभ्यास करणे ही काळाची गरज होत आहे असे प्रतिपादन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यादोराव पंचमवार यांनी स्थानिक देवरी येथील तालुका क्रीडा संकुल येथे क्रीडा व युवक संचालनालय म.रा. पुणे अंतर्गत तालुका क्रीडा संकुल समिती देवरी आणि दिनबंधु ग्रामीण विकास संस्था देवरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
“आंतरराष्ट्रीय क्रीडा दिनाच्या” समारोह प्रसंगी केले.कार्यक्रमाच्या उद्धघाटन सत्राच्या अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.पुढे विद्यार्थ्यांना संबोधित करतांना ते बोलले की आधी च्या काळात या सर्व निसर्गातील गोष्टींना फार महत्त्व मिळत होते परन्तु आता या गोष्टीकडे फार कमी लोकांचा लक्ष असून आता ही संपत्ती जपून ठेवण ही आपली जवाबदारी असून प्रत्येकाने ती पूर्ण केली पाहिजे असेही ते बोलले.समारोहाचे विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र पत्रकार संघाचे उपाध्यक्ष श्री विलास जि शिंदे, तर प्रमुख अतिथी म्हणून दिनबंधु ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष कुलदिप लांजेवार,तायक्वांडो चे प्रशिक्षक अमित मेश्राम,योगशिक्षक चि.तेजस मते,चि.देवाशीष मारबते, चि.कुणाल चुटे हे उपस्थित होते.दीपप्रज्वलन करून समारोहाच्या उद्धघाटन सत्र प्रारंभ करण्यात आला.यावेळी विशेष अतिथी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना,दैनंदिन जीवनात योगाभ्यास केला तर काय फायदे होतात यावर प्रकाश टाकत बोलुन दाखवन्यापेक्षा स्वतः कृतीतुन त्यांना दैनंदिन जीवनात कसा फायदा होतो आहे यावर प्रकाश टाकत,योग दिनाचे महत्त्व उपस्थितातांना पटवून दिले.यावेळी उपस्थित योग शिक्षकांच्या मार्गदर्शनात नगरातील उपस्थितांनी योगाभ्यास करून आंतरराष्ट्रीय दिनाच्या या समारोहात बहुसंख्येने सहभाग नोंदवुन आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला.कार्यक्रमाचे प्रस्ताविक कुलदिप लांजेवार यांनी केले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका क्रीडा संकुलचे क्रीडा मार्गदर्शक रवी काळे,स्वपनील ठाकरे,हर्षवर्धन मेश्राम,संतोष चनाप,सुरेश राठी यांच्या सह संस्थेच्या स्वयंसेवकांनी सहकार्य केले.

Print Friendly, PDF & Email
Share