80 हजार रुपयांची लाच प्रकरणी वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात

गोंदिया : 80 हजार रुपयांची लाच प्रकरणी गोंदिया नगर परिषद येथील एक वरिष्ठ लिपिक एसीबी च्या जाळ्यात आज 21 जुन रोजी अडकला आहे. आरोपी चे नाव अब्दुल सलाम वल्द हबीब कुरेशी वय 51 वर्ष रा. नुरी मस्जित च्या मागे, सिव्हिल लाईन गोंदिया, जिल्हा – गोंदिया, पद – वरिष्ठ लिपिक, नगर रचना विभाग, नगरपरिषद गोंदिया ( वर्ग – 3) याने लाच मागणी 80,000 रु. केली होती त्याची पडताळणी दि. 12/06/2023 रोजी गोंदिया एसीबी ने केली होती.

तक्रारदार यांचे व त्यांचा आई आणी बहिणीचा नावाने असलेले गोंदिया नगरपरिषद हद्दीतील घराची अकृषक वापराची परवानगी जिल्हाधिकारी गोंदिया यांचे आदेशाने रद्द झालेली असल्याने आरोपी याने तक्रारदार यांना सदर घराचा आणी त्याघराचे प्लॉट चा गुंठेवारी NA करून देण्याकरिता तक्रारदारास 80 हजार रु. लाच रकमेची मागणी करून त्यापैकी 30 हजार रु. घेतले आणी उर्वरित 50 हजार रु. लाच रक्कम आणून देण्यास सांगितले.

पळताळणी दरम्यान पंचासमक्ष आरोपी याने तक्रारदाराकडून या.आधी 30 हजार रु. घेतल्याचे मान्य करून उर्वरित 50 हजार रु. लाच रकमेची तक्रारदारास मागणी करून लाच रक्कम प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. आरोपीस ताब्यात घेण्यात आले. असून त्याचे विरुद्ध पोलीस स्टेशन – गोंदिया शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आले आहे.

सदर कारवाई पोलीस उप अधीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अतुल तवाडे, स. फौ. विजय खोब्रागडे, पो. हवा. संजय बोहरे, नापोशी संतोष शेंडे, अशोक कापसे, कैलास काटकर, प्रशांत सोनवाने, संगीता पटले चालक, दीपक बतबर्वे सर्व यांच्या पथकाने केली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share