गोंदिया जिल्ह्यातील 1292 शाळा झाल्या धूरमुक्त

गोंदिया ◼️जिल्ह्यातील शालेय पोषण आहार योजनेसाठी पात्र असलेल्या शाळांना शिक्षण विभागाने प्रतयेकी 4 हजार 90 रुपये एवढा निधी गॅस जोडणीसाठी उपलब्ध करुन दिला आहे. जिल्हा परिषद,नगर पालिका व खासगी अनुदानीत शाळांना या निधीतून गॅस जोडणी देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील 1292 शाळा धूरमुक्त झाल्या आहेत.

केंद्र शासनाच्या माध्यान्ह भोजन योजनेतंर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेतच पोषण आहार दिला जातो. प्रतयेक शाळेत पोषण आहार शिजविण्यासाठी चुलीचा वापर केला जात होता. शाळेतच आहार शिजविला जात असल्याने चुलीतील धूर वर्गा पसरुन विद्यार्थ्यांना त्रास होतो. त्यामुळे शाळा धूरमुक्त करण्यासाठी शालेय पोषण आहार योजनेतंर्गत जिल्ह्यातील 1 हजार 292 शाळा गॅस जोडणीसाठी पात्र ठरल्या. या शाळांना गॅस जोडणीसाठी निधी देण्यात आला. शिक्षण संचालक कार्यालयाकडून शाळांच्या बँक खात्यात हा निधी आभासी वितरीत करण्यात आला. शासन निर्णयानुसार शाळांनी गॅस एजेंसीकडून शालेय व्यवस्थापन समितीने गॅस जोडणी करुन घेतली. त्यामुळे विद्यार्थी, शाळा तसेच स्वयंपाकीन ताईंना देखील धुरापासून मुक्तता मिळाला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share