आदिवासी आश्रमशाळेच्या 32 विद्यार्थ्यांचे एमएचटी-सीईटीत यश

देवरी ◼️ येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावणे व उच्च शिक्षणाकडे तसेच अभियांत्रिकी व वैद्यकीय क्षेत्राकडे जाण्याचा कल वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. याचाच सकारात्मक परिणाम म्हणून नुकत्याच घोषित झालेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेत आदिवासी आश्रम शाळेतील 32 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

मिशन शिखर योजना सन 2022 पासून राबविण्यात येत आहे. मिशन शिखरमुळे अतिदुर्गम, नक्षलक्षेत्र आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना नीट, जेईई व एमएचटी-सीईटी बाबत योग्य मार्गदर्शन मिळाले. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला. 12 जून रोजी एमएचटी-सीईटीचा निकाल जाहिर झालेला असून एकूण 45 विद्यार्थ्यांपैकी 32 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत आणि एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल बोरगाव बाजार येथील विद्यार्थीनी तनू ठाने हिने पीसीएम ग्रृपमध्ये 84 टक्के तर सोनम सहाळा हिने पीसीबी ग्रृपमध्ये 71 टक्के गुण घेऊन देवरी प्रकल्पाचे नाव लौकिक केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share