गोंदिया जिल्हात लवकरच साकारणार वाहन निरीक्षण व परीक्षण केंद्र..!

गोंदिया ◼️रस्ते अपघात मृत्यू रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन झालेल्या रस्ता सुरक्षा समितीच्या सल्ल्यानुसार वाहन निरीक्षण व परीक्षण केंद्र उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. यातंर्गत गोंदिया देखील वाहन निरीक्षक व परीक्षण केंद्र साकारणार असून या केंद्रामुळे जिल्ह्यात अपघात रोखण्यास मदत होणार आहे.

रस्ता सुरक्षेबाबत अनेक उपाययोजना करुनही 2023 मध्ये रस्ते अपघातात मृत्यूचे प्रमाण वाढले आहेत. रस्ते सुरक्षेबाबत होणारा हलगर्जीपणा हा नेहमी अपघातांना आमंत्रित करत असतो. त्याची किंमत संबंधित तसेच निरपराध पादचार्‍यांना प्राण गमावून मोजावी लागते. दरवर्षी अपघाताच्या प्रमाणाची टक्केवारी वाढत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात जानेवारी ते एप्रिल या कालावधीत 80 अपघातांची नोंद झाली आहे. त्यात 48 वाहन चालक व स्वारांनी आपला जीव गमावला असून 56 जण गंभीर जखमी झाले आहे. रस्ते अपघात कसे रोखता येईल, यासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी तसेच त्या सुरक्षा योजनांचा आढावा घेऊन वेळोवेळी सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर करण्यासाठी रस्ता सुरक्षा समिती कार्यान्वित आहे.

या समितीच्या शिफारशीनुसार रस्ता सुरक्षाविषयक कामकाजासाठी स्वतंत्रपणे रस्ता सुरक्षा निधी नियंत्रण समिती स्थापन होऊन 20 एप्रिल रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 372 कोटी खर्चाच्या 20 वाहन निरीक्षण व परीक्षण केंद्र उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आले. त्यासंबंधितचे परिपत्रक आता गृह विभागाने काढले आहे. यात गोंदियाचा देखील समावेश आहे. या केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील रस्ते अपघात व मृत्यू रोखण्यास मदत होणार आहे.

Print Friendly, PDF & Email
Share